दिले चाळीस दिवस दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन दरम्यानकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये तीन कृषी कायद्यांवर आज (4 जानेवारी) झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही.पुढची बैठक 8 जानेवारीला होणार आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात 40 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.
कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवरचं शेतकरी आंदोलन 40 दिवसांनंतरही अद्याप सुरूच आहे. आज शेतकरी नेते आणि भारत सरकार यांच्यात सातव्या टप्प्यातील चर्चा झाली.शेतकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. एक म्हणजे तिन्ही कृषी कायदे मागे घेतले जावेत आणि दुसरं म्हणजे किमान हमी भावाला कायदेशीर दर्जा मिळावा.या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
"८ जानेवारी रोजी सरकारसोबत पुन्हा एकदा बैठक होईल. तिन्ही कृषी कायदे रद्द व एमएसपी या दोन्ही मुद्यांवर ८ जानेवारी रोजी पुन्हा एकदा चर्चा होईल. आम्ही स्पष्ट केलं आहे की, जोपर्यंत कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत घरवापसी करणार नाही." असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारसोबतच्या आजच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.