महाज्योतीला कोणी वाली नाही?

Update: 2022-03-20 11:07 GMT

सामाजिक न्यायाचे कारण सांगत सारथीसाठी संभाजीराजे लढतात तर बार्टीसाठी प्रकाश आंबेडकर भूमिका घेतात. परंतु OBC साठी असलेल्या महाज्योतीला कोणी वाली नाही असं सांगत पीएचडी धारक नितीन आंधळे त्याच्या इतर पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसोबत आझाद मैदानावर उपोषणाला बसला आहे.

सारथी, बार्टी च्या अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येपेक्षा महाज्योती अंतर्गत येणारी लोकसंख्या ही तिप्पट आहे. महाज्योती संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणात कमी निधी देणे हे पुन्हा एकदा दाखवून देते कि प्रस्थापितांच्या मनात इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त समाजा विषयी असलेला कृतघ्न भाव किती खोलवर रुजलेला आहे. प्रस्थापित समाजाला ताटात आणि ओबीसी भटक्या-विमुक्तांना ओंजळीत वाढायचे धोरण ही व्यवस्था राबवत आहे.सर्वपक्षीय ओबीसी नेते स्व पक्षाची हुजरेगिरी करण्यातच व्यस्त आहेत असा आरोप नितीन आंधळेंनी केला आहे.

नितीन आंधळे गेली एक वर्ष झाले महाज्योती संस्थेला उभे करण्यासाठी आणि प्राध्यापक भरतीत OBC ला त्यांच्या हक्काच्या जागा मिळाव्यात म्हणून लढत आहे. प्राध्यापक भरतीत ओबीसी ला न्याय देणारा संवर्ग निहाय आरक्षण कायद्याचा लढा यशस्वी करून OBC विद्यार्थ्यांचे भविष्य असलेल्या महाज्योती साठी महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या माध्यमातून तो लढतोय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व इतर अनेक मंत्री, आमदार , खासदार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन OBC ना न्याय देण्याची मागणी त्यांने केली. परंतु प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने ओबीसीच्या तोंडाला पाने पुसण्याचा शिवाय इतर काही केले नाही. सारथी व बार्टी PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना 40 हजार रुपये प्रति महिना देतात. तर महाज्योती गेली तीन वर्ष झालं 21 हजार देणार म्हणते पण अजून काहीच देत नाही. गेल्या दोन वर्षात सारथी - बार्टीने 4 जाहिराती पूर्ण केल्या. महाज्योती अजून एक पण जाहिरात पूर्ण करू शकली नाही. सारथी व बार्टीच्या मागण्या पूर्ण झाल्या पण महाज्योती चे काय ?

ओबीसींचा गौरवशाली इतिहास बाहेर येऊ नये म्हणून त्यांचे संशोधन रोखण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे. हा लढा फक्त PhD धारकांचा नसुन ओबीसींच्या इतिहासाचा, अस्मितेचा, संघर्षाचा आह, असे श्रीहरी पेडणेकर यांनी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News