मला मुंबईत रहायला कोणाच्या परवानगीची गरज नाही :कंगना रणौत
वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष करत मुंबईत राहण्यासाठी कुणाच्या परवानगी ची गरज नसल्याचे म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. दरम्यान, कंगना राणौत ही मंगळवारी मुंबईतील श्री सिद्धीविनायक बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कंगनासह तिची बहिण रंगोली चंदेल ही देखील उपस्थितीत होती. सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर कंगनाने उपस्थितांना 'जय महाराष्ट्र' ही केला. यासह "मला मुंबईत रहायला कुणाच्या परवानगीची गरज नाही', असं म्हणत कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधत सेनेला डिवचले आहे.
"मला मुंबईत रहायला कुणाच्या परवानगीची गरज नाही, मी कुणाकडे परवानगी मागितली नाही. माझ्यासाठी केवळ बाप्पाचा आशिर्वाद आणि त्याची परवानगी महत्त्वाची आहे", अस म्हणत कंगनाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष करत मुंबईत राहण्यासाठी कुणाच्या परवानगी ची गरज नसल्याचे म्हटले आहे.