संरक्षण खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या लेखनावर बंधन, मोदी सरकारचा निर्णय

Update: 2021-06-03 16:04 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीत येणाऱ्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार आता भारतातील गुप्तचर आणि संरक्षण विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुढे निवृत्त झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे लिखाण करण्यासाठी बंदी घातली गेली आहे. जर एखाद्या अधिकाऱ्याला लिखाण करायचे आहे. त्या अधिकाऱ्याला संबंधित विभाग प्रमुखाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अधिकारी संरक्षण विभागातून निवृत्त झाल्यानंतर लिखाण करत असतात. विविध पदावर असणारे अधिकारी निवृत्त झाल्यानंतर विविध वृत्तपत्रांमध्ये, यूट्युब चॅनलवर आपलं मत व्यक्त करत असतात. त्यावर आता बंधन येणार आहे. या लिखाणामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतो असं मत व्यक्त करत ही बंधन घालण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणातील कर्मचाऱ्यांवर बंधन घालण्यात आली आहेत.

Full View

Tags:    

Similar News