लॉकडाऊनचा निर्णय नाही, मात्र, निर्बंध कडक करणार : राजेश टोपे

Update: 2020-11-23 16:24 GMT

राज्यात निर्बंध लावण्याची मुख्यमंत्र्यांचीही इच्छा आहे- लाॅकडाऊन नसला तरी शिथिल केलेेले निर्बंध पुन्हा लावणार. सोशल डिस्टंसिंग मेंटेन होत नसल्यानं राज्य सरकार कठोर निर्णय घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.जालना येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत काही गोष्टींबाबत बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर घोषणा होणार आहे.राज्यात कोरोनाच्या नियमांचे पालन करावेच लागेल.मास्कचा वापर करावाच लागेल. सध्या सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा प्रामुख्याने कडक करणार असल्याचं ही टोपे म्हणाले.

Full View


Tags:    

Similar News