सध्या भारतातील कोविड -१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. अनेक रुग्ण ऑक्सिजन सह इतर औषधांच्या कमतरतेमुळे मरणाला बळी पडताना दिसत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तरप्रदेशमध्ये परिस्थिती इतकी बिकट आहे की, दवाखान्यात उपचारासाठी तर स्मशानात अंतिम-संस्कारासाठी रांग लावावी लागत आहे.
देशभरातील लोक ठिकठिकाणाहून फोटो शेअर करत आहेत. ज्यात लोकांच्या अंत्यसंस्काराला जाळण्यासाठी जागा नसल्याचं दिसून येत आहे. बऱ्याचशा ग्राउंड रेपोर्टद्वारे अनेक फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. ज्यामध्ये अंतिम-संस्कारासाठी लोकांच्या लांबच - लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. एक असंच दृष्यही पाहायला मिळालं ज्यात एकाच वेळी ८ मृत व्यक्तींनी अग्नी देण्यात आला आहे.
हे सगळे फोटो पाहून विरोधी पक्ष तसेच पत्रकारांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर जोरदार टीका करत आहेत.
हे सगळं घडत असताना आपच्या ( AAP ) सदस्या अंकिता शहा यांनी नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना स्मशानभूमीत जळत असलेल्या मृतदेहांचा फोटो शेअर केला. ज्यात त्यांनी लिहिले की -
एवढं सगळं झाल्यानंतर ? तुम्ही यासाठी जबाबदार आहात.
हे चित्र Tribal Army या अधिकृत ट्विटर हँडलवरही शेअर केले गेले होते आणि असे लिहिले होते की -
"जेव्हा प्रजेचा एक भाग मूर्ख असतो, तेव्हा देशाचा राजा अपयशाचा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करतो."
हे छायाचित्र युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव अमरीश रंजन पांडे आणि उत्तर प्रदेशचे डॉ. कफील खान यांनी सुद्धा शेअर केलं होत.
hindiscriptwriter.blogspot.com वर आढळलेल्या ब्लॉगच्या माहितीनुसार स्मशानभूमीवरील हा फोटो कृष्णा कुमार यांनी 25 जानेवारी 2012 रोजी अपलोड केला होता आणि लिहिलं होतं –
"बनारस, जगातील सर्वात प्राचीन शहर अद्याप जिवंत आहे. (वाराणसीचा मणिकर्णिका घाट). "
या ब्लॉग पोस्टमध्ये बनारसची अनेक छायाचित्रे शेअर केली गेली आहेत. ब्लॉगवर कृष्णा कुमार शर्मा यांचा मोबाइल नंबरही होता. अल्ट न्युजने त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अल्ट न्युजला सांगितले की, "मी माझ्या फोनमध्ये हा फोटो काढला होता. बनारसच्या मणिकर्णिका घाटावरचा हा फोटो आहे. मी जानेवारी २०१२ मध्ये तो अपलोड केला परंतु तो अपलोड करण्यापूर्वी 1-2 महिन्यांपूर्वीच मी हे काढलेले होते. "
म्हणजेच, स्मशानभूमीचे हे छायाचित्र मागील काही दिवसांमध्ये काढलेले नाही. ते किमान 9 वर्ष जुने आहे. याबद्दल एका व्यक्तीने डॉ. कफील यांना त्यांच्या पोस्टवर कमेंट करून माहिती दिल्यानंतर डॉ. कफील यांनी आपल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
I know current pics are more horrifying than this... But this particular pic is from 2012 or older.
— Dr Kafeel Khan (@drkafeelkhan) April 20, 2021
M sorry for the wrong pic 🙏