आमदारांना मोफत घरं नाही : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण

Update: 2022-03-25 08:15 GMT

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात ३०० आमदारांना घरं देण्याची घोषणा झाल्यानंतर सर्व स्थरातून टिका झाल्यानंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन आमदारांना मोफत नाही तर जागेचा आणि बांधकामाचा खर्च आकारुन घरं दिली जाणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

लोकांच्या घरांचा प्रश्न आणि लोकप्रतिनिधी यांच्या घराचा ही प्रश्न आहे. आमदारांना घरेही मिळणार आहेत. आमदारांसाठी 300 घरं बांधणार आहोत, सर्वपक्षीय आमदारांना घरं आवश्यक आहेत, आमदारांनाही चांगल्या घरांची गरज, कायमस्वरुपी घरं देणार, असं मुख्यमंत्री काल विधानसभेत म्हणाले होते.

त्यावर समाजमाध्याममधे तीव्र प्रतिक्रीया येत आहे. ज्येष्ठ पत्रकार रवीकिरण देशमुख यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

यापूर्वी आमदारांना सुखदा आणि राजयोग सोसायटीत दिलेल्या घरांचा आढावा घेण्याची सूचना रवीकिरण देशमुख यांनी दिली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या स्पष्टीकरणात आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे असे सांगितले आहे.

Tags:    

Similar News