पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई नाही, लष्कराचे स्पष्टीकरण

No firing at LOC in Kashmir, army clarifies after news of pinpoint terror attack in POK;

Update: 2020-11-19 15:09 GMT

भारत- पाक सीमेवर गुरूवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत हल्ले केल्याने भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी स्थळांना लक्ष्य केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी पीटीआयच्या हवाल्याने दिले आहे. पण भारतीय लष्कराने यावर तातडीने स्पष्टीकरण देत गुरूवारी सीमेवर कोणताही गोळीबार झाला नाही असे स्पष्ट करण्यात आल्याचे एएनआयने या वृत्तसंस्थेने सांगितले आहे.

पीटीआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार थंडी सुरू होण्याआधी पाकिस्तान जास्तीत जास्त अतिरेक्यांना भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सीमेवर पाकतर्फे गोळीबार करण्यात आला तसंच हल्ले करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसात वाढलेले आहे. त्यामुळेच अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतीय लष्करातर्फे पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेदी हल्ले करुन दहशतवाद्यांची तळं उध्वस्त करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, अशी माहिती पीटीआयने या वृत्तामध्ये दिली आहे. दहशतवाद्यांना घुसवण्यासाठी पाकतर्फे कायम असा गोळीबार करण्यात येतो. पण भारतीय लष्कर त्यांला प्रत्युत्तर देत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पण यानंतर काही माध्यमांनी यासंबंधातले वृत्त दिल्यानंतर लष्कराने गुरूवारी सीमेवर कोणत्याही प्रकारची फायरिंग झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News