सामान्यांना सरकारचा शॉक, वाढीव वीजबिलं भरावीच लागणार - ऊर्जामंत्री

लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलामुळे शॉक बसलेल्या वीजग्राहकांना आता उर्जामंत्र्यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा सुपरशॉक बसला आहे. वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं स्पष्टीकरण आता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहे.;

Update: 2020-11-17 08:44 GMT

लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, सर्वसामान्यांना शॉक बसला आहे.

वीज कंपनीने लॉकडाऊन काळात वीज पुरवठा केला. वीज कंपन्यांवर 69 हजार कोटीचं कर्ज आहे.आम्ही कर्ज काढून काम करत आहोत अजून किती करणार? त्यामुळं आता लॉकडाऊन मध्ये आलेली वीज बिलं भरली पाहिजेत.आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, चालवण्याला पण आम्हाला क्षमता आहे.बीज बिल सवलतीचा विषय आता नाही. कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत असं ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. "लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही", असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. तुम्ही जसे ग्राहक आहात तसं आम्ही सुद्धा वीज ग्राहक आहोत, आम्हाला सुद्धा वीजेचं बिल द्यावं लागतं. वापरापेक्षा वाढीव बिलं आली असतील त्याची चौकशी सुरु आहे. पण ज्यांनी वीज वापरली आहे त्यांना बिल भरावं लागेल असं नितीन राऊत म्हणाले.

वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बिल सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असं नितीन राऊत म्हणाले.

महावितरणने 24 तास वीज उपलब्ध केली. लोकांनी वीज वापरली त्याची बिलं भरावी. वीज कंपनीने लॉक डाऊनमध्ये वीज पुरवठा केला. महावितरणवर 69 हजार कोटी कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला.

महावितरणकडून वसुलीबाबत परिपत्रक जारी

दरम्यान, महावितरणने वीजबिल वसुलीबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार डिसेंबर 2020 पर्यंत थकीत वीजबिले भरावी लागणार आहेत.

Tags:    

Similar News