सोशल मीडियावर सध्या नवी मुंबईतील महापालिकेच्या स्वच्छताविषयक घोषणेतील लिखाणातील चुकीचा फोटो व्हायरल झाला आहे. इथल्या एका गार्डनच्या भिंतीवर आरोग्य जनजागृतीसंदर्भातल्या घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.
त्यामध्ये स्वच्छता पाळा, आरोग्य टाळा असे चुकून पेंट करण्यात आले होते. यासंदर्भातले फोटो व्हायरल होताच नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने याची दखल घेतली आणि त्या घोषणेतील चूक दुरूस्त करुन स्वच्छता पाळा, रोगराई टाळा अशी घोषणा करुन घेतली.