केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या खात्यात वेगवेगळे उपक्रम ते नेहमी राबवत असतात. सध्या प्रदुषण मुक्तीवर त्यांनी भर दिला असून इलेक्ट्रिक गाड्यावर भर देण्यासाठी नवीन वाहन धोरण देखील जाहीर केलं आहे.
या सुरुवात गडकरींनी स्वत: पासून केली आहे. नागपुरात आल्यानंतर गडकरी आपली बुलेटप्रूफ गाडी बाजूला ठेऊन इलेक्ट्रीक कारचा वापर करणार आहेत. या संदर्भात बोलताना गडकरी यांनी आपण नागपूर शहराला स्वच्छ, हरित, सुंदर ठेवण्यासाठी इंधनाच्या कार वापरणार नाही. असं म्हटलं आहे.