जे लोक प्रामाणिक असतात ते मार्केटिंगमध्ये कमी पडतात, त्यामुळे तुमच्या उत्पादनांना मार्केट हवे असेल तर त्याचे मार्केटिंग करा असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. खादी इंडियातर्फे शेणापासून तयार करण्यात आलेला प्राकृतिक पेंट मंगळवारी लाँच करण्यात आला, त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या विविध देशी वस्तुंही लाँच करण्याच आल्या.