केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कायम चर्चेत असतात. त्यांच्या अनेक भाषणांच्या अनेक क्लिप्स सतत व्हायरल होत असतात. ज्यामध्ये ते केंद्र सरकारवर टीका करत असल्याचं आपल्याला पाहयला मिळतं. नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीमधून देखील नितीन गडकरी यांचं नाव वगळल्यानंतर पुन्हा एकदा अशा व्हिडीओज व्हायरल होऊ लागल्या आहेत. पण या व्हिडीओजचं फॅक्ट चेक स्वतः नितीन गडकरी करत आहेत आणि लोकांसमोर मांडत आहेत. नेमकी याची सुरूवात कशी झाली हे पाहूयात.
नितिन गडकरी हे भाजप सरकारमधील एक सुज्ञ राजकारणी आणि मंत्री म्हणुन ओळखले जातात. पण नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतुन नितीन गडकरींना वगळण्यात आलंय. आणि तेव्हापासून सातत्याने गडकरींच्या भाजपमधील कमी होणाऱ्या वजनाबाबत चर्चा होऊ लागल्या. परंतू अद्यापही नितीन गडकरी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यात नितीन गडकरी यांची भाषणं कोणाचीही तमा न बाळगता केली गेलेली असतात. त्यामुळे सध्याच्या घडीला त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत.
आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय सिंह यांनी नितिन गडकरी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी, "अखेर नितीन गडकरी असं का म्हणाले?, BJP खुप मोठी गडबड सुरू आहे." असं कॅप्शन दिलं आहे. त्या व्हिडीओमध्ये नितिन गडकरी म्हणत आहेत, "आजही मी एक सामान्य व्यक्ती आहे. फुटपाथवर जेवणारा, थर्ड क्लासमध्ये चित्रपट पाहणारा आणि नाटक पाठीमागून पाहणाऱ्या व्यक्तींमधून मोठा झालो आहे. मला ते आयुष्य फार आवडतं. मला ते सुरक्षेच्या अडचणी येतात त्यामुळे सगळ्यांना सोडल्यावर मी निघून जातो एकटाच फुटपाथवर...कारण सहसा तिथे मला माझी लायकी कळते. आपल्याला शक्य असेल तर माझ्या मागे उभे रहा... नाही राहीलात तरी काही फरक पडत नाही. गेलं तर गेलं माझं पद... त्याची चिंता नाही." यातली शेवटची काही वाक्य ही एडीट करून वारंवार या व्हिडीओच्या सुरूवातीला आणि शेवटी चालवली गेली आहेत.
आख़िर ऐसा क्यों बोले नितिन गडकरी जी?
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) August 25, 2022
BJP बहुत बड़ी गड़बड़ चल रही है। pic.twitter.com/woHE4mhNcn
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील नितिन गडकरी हे काय म्हणत आहेत अशा कॅप्शम खाली हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
गडकरी क्या कह रहे है!!! pic.twitter.com/USsRCczyeS
— Atul Londhe (@atullondhe) August 25, 2022
आणि या दोन्ही नेत्यांचे ट्विट्य हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. म्हणुन मग कुणाचीही वाट न पाहता या व्हिडीओचं फॅक्ट चेक केलं आहे. आणि व्हायरल होणार व्हिडीओ कसा दिशाभुल करणारा आहे हे सांगितलं आहे. नितिन गडकरी म्हणतात, "काही वृत्तसमुहांकडून आणि व्यक्तींकडून चालवण्यात येणाऱ्या खोट्या मोहिमेचं सत्य!" असं कॅप्शन देत त्यानी मुळ व्हिडीओ शेअर केला आहे.
ज्यात त्यांनी कुपोषणा बद्दल बोलताना अमरावतीमधील एक किस्सा सांगितला आहे. आणि त्यावेळी बोलताना ते वरील वाक्य विविध संदर्भांमध्ये बोलले आहेत. पण एडीट करणाऱ्यांनी हा व्हिडीओ फक्त हवा तसा हवा तिथे कट मारून एडीट करून घेतला आहे.
कुछ मीडिया संस्थानों और व्यक्तियों द्वारा चलाये जा रहे झूठे अभियान की सच्चाई। pic.twitter.com/O7v3MikOYP
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) August 25, 2022
त्यांचा आणखी एक मुंबईतील कार्यक्रमामधील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे त्या बाबतीतहा त्यांनी व्हायरल आणि मुळ असे दोन्ही व्हिडीओ एकत्र दाखवत फॅक्ट चेक केलं आहे.
आधी हकीकत, आधा फसाना.. देखें किस तरह चार दिन पहले मुंबई में श्री नितिन गडकरी जी के वक्तव्य का प्रोपेगेंडा तैयार किया गया। pic.twitter.com/5j0I8lPtHR
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) August 25, 2022
एकंदरीत काय भाजपचं विरोधकांसाठीचं सर्वाच मोठं आणि महत्वाचं शस्त्र सोशल मिडीया हे त्यांच्याच विरोधात उलटू लागलं आहे हे निश्चित आणि त्यासाठीच आता नितिन गडकरींना आपल्या कामकाजासोबतच असे फॅक्ट चेक करण्याची वेळ आली आहे.