राज्यात पुन्हा एकदा कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. नेते अभिनेते यांना कोरोना लागन झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. नितीन गडकरी यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. गडकरी सध्या गृह विलीगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले आहेत. ट्वीट करुन त्यांनी याबाबत माहिती दिली.
I have tested positive for Covid 19 today with mild symptoms. Following all the necessary protocols, I have isolated myself and I am under home quarantine. I request all those who have come in contact with me to isolate themselves and get tested.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 11, 2022
ट्विट करत ते म्हणले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. काल राज्यात करोनाच्या ३४, ४२४ नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ११, ६४७ रुग्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रातले आहेत.