भिडे गुरूजींचे नाव घेऊन अवैध धंदे, नितीन चौगुले यांचा गंभीर आरोप

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक असणारे नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठान मधून निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे जाहीर केल्यानं प्रखर हिंदुत्वाचा प्रसार करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमधे उभी फुट पडली आहे.;

Update: 2021-02-24 12:12 GMT

शिवप्रतिष्ठान मधील काही व्यक्तींच्या मुळे आपल्यावर नाहक आरोप झाले. या मंडळींच्या मुळे भिडे गुरुजींच्या मनात आपल्या बद्दल गैरसमज पसरले आहेत, असे नितीन चौगुले म्हणाले आहेत.भिडे गुरूजींकडून काही धारकरी अवैध कामे करून घेतात असा गंभीर आरोप नितीन चौगुले यांनी केला आहे. यावर चौगुले म्हणाले, काही वाळू तस्कर, तडीपार झालेले, लॉटरीवाले असे काही लोक गुरूजींना घेऊन काही अधिकाऱ्यांकडे आणि राजकीय लोकांकडे फिरत असतात आणि त्यांच्याकडून अवैध कामे मंजूर करून घेतात.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये अखेर फूट पडली आहे. काही दिवसांपूर्वी कार्यवाहक पदावरून हटवलेल्या नितीन चौगुले यांनी अखेर आपली वेगळी संस्था काढली आहे. राज्यातल्या शेकडो धारकऱ्याच्या उपस्थितीमध्ये शिवभक्ताचा मेळावा घेत 'श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थान संस्था' ची घोषणा केली आहे. या संस्थेची स्थापना करत असल्याची घोषणा करत संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान समोर एक आव्हान उभा केले आहे.

शिवप्रतिष्ठान प्रमाणेच शिवाजी महाराजांच्या विचारावर ही संस्था काम करत गडकिल्लेचे संवर्धन करण्याचे काम आम्ही करू असे चौगुलेनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजी भिडेगुरुजी यांच्या संघटनेमध्ये गृहकलह सुरू होता आणि यातून प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांचं निलंबन झाले होते.

कोणतेही कारण नसताना हे निलंबन झाल्याचा आरोप करत नितीन चौगुले यांनी राज्यातील धारकऱ्यांना चलो सांगलीची हाक देत आपली भूमिका स्पष्ट करण्याचं जाहीर केलं होतं, त्यानुसारच सांगलीमध्ये आज डेक्कन या ठिकाणी नितीन चौगुले समर्थक धारकऱ्यांचा शिवभक्तांचा मेळावा पार पडला.या मेळाव्यातून नितीन चौगुले यांनी शिवप्रतिष्ठान मधील काही व्यक्तींच्या मुळे आपल्यावर नाहक आरोप झाले. या मंडळींच्या मुळे भिडे गुरुजींच्यामनात आपल्या बद्दल गैरसमज पसरले आहेत, असं मत व्यक्त करत गुरुजींनी दिलेले विचार यापुढे घेऊन जाण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संस्था स्थापन करत असल्याचं जाहीर करत या संस्थेच्या माध्यमातून या पुढे आपलं कार्य सुरू राहील असं स्पष्ट केले आहे.


काही नेते मंडळी भिडे गुरूजींकडून अवैध कामे करून घेतात असा गंभीर आरोप नितीन चौगुले यांनी केला आहे. यावर चौगुले म्हणाले, काही वाळू तस्कर, तडीपार झालेले, लॉटरीवाले असे काही लोक गुरूजींना घेऊन काही अधिकाऱ्यांकडे आणि राजकीय लोकांकडे फिरत असतात. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने संभाजी भिडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा विषय संघटनेच्या अंतर्गत असून त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही असे सांगितले.

Tags:    

Similar News