पोट्टहो, कराळे मास्तर बनले पेशल गेश्ट !

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-07-08 09:08 GMT
पोट्टहो,  कराळे मास्तर बनले पेशल गेश्ट !
  • whatsapp icon

आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी हे आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले आहेत. वर्ध्यातल्या कराळेमास्तरांनी वऱ्हाडी बोली भाषा आणि शिक्षण यांचा सुरेख मेळ घातला आहे. हेच मास्तर आता सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपतीच्या हॉटसीटवर बसून प्रश्नांची उत्तरं देणार आहेत.

येत्या शनिवारच्या ९ जुलैच्या विशेष भागात नितेश कराळे गुरुजी सहभागी होणार आहेत. त्यांच्यासह कर्नल सुरेश पाटील हेही सहभागी होणार आहेत. युट्यूबवर लोकप्रिय ठरलेल्या कराळे गुरुजींना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

कोरोनाच संकट येण्यापूर्वी कराळे सर 300 विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं शिकवायचे. मात्र करोनामुळे शासनानी लॉकडाऊन केलं आणि सुरू असलेले क्लासेस बंद पडले. कराळे गुरुजींनीही ऑनलाईन क्लास सुरू केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना गुगल मीट, झूम अ‍ॅप यांच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला, पण तिथंही अडचणी आल्यानं त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले. हळूहळू त्यांचे प्रेक्षक वाढू लागले. ज्वालामुखी शिकवताना कराळे गुरुजींची बोली अस्सल वऱ्हाडी असल्याने 'खदखदणारा' ज्वालामुखी, भूगोलातला लाव्हा रस, मराठीतले व्याकरण, इतिहास आणि गणित शिकवतानाही त्यांच्या बोलीमुळे विद्यार्थ्यांना उत्तरं लक्षात राहण्यास चांगलीच मदत होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

Tags:    

Similar News