अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतीची मोदींवर टीका, मनमोहन सिंह यांचं केलं कौतुक
अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी सरकार लोकांची मदत करण्याऐवजी हेडलाईन मॅनेजमेंट आणि आपली पाठ थोपटून घेत आहे. अशा शब्दात सरकारवर टीका केली आहे. परकला प्रभाकर यांनी 'Midweek matters' या त्यांच्या ब्लॉगमध्ये मोदी सरकारवर टीका केली आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची स्तुती केली. तसंच त्यांनी दिलेला सल्ला रचनात्मक होता. मात्र, यावर केंद्रीय मंत्र्यांनी असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पत्राला राजकीय मुलामा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
भारतात कोरोना संक्रमणाची गती वाढली आहे. दररोज होणारे लोकांचे मृत्यू दररोज नवनवीन रेकॉर्ड तयार करत आहेत. ही आरोग्य आणीबाणी आहे. हा केंद्र सरकारचं उत्तरदायित्व आणि जबाबदारी पाहण्याचा काळ आहे. यांना आपल्या लोकांचा मृत्यू वाईट वाटतो. दुसऱ्यांचा मृत्यू फक्त खाली आकडा वाटतो. अशा शब्दात सद्यस्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे. वास्तविक आकडे लपवले जात आहेत...
अर्थशास्त्रज्ञ प्रभाकर म्हणतात... या संकटामुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. कोरोनावर उपचार करण्यात स्वत:ची सर्व कमाई संपवून जात आहे. मोठ्या प्रमाणात लोक आर्थिक नुकसानीतून वरती आलेले नाहीत. जेव्हापासून ही महामारी सुरु झाली आहे. तेव्हा पासून देशात जवळ जवळ 1.80 लाख लोकांनी आपला जीव गमवला आहे. वास्तवीक आकडे लपवले जात आहेत. सरकार सांगत असलेले आकडे वास्तविक स्थितीपेक्षा कमी आहेत.
राजकीय नेत्यांवर काय फरक पडला?
कोरोना टेस्टची संख्या सतत घटत आहे. लसीकरणाची गती देखील कमी आहे. रुग्णालय आणि प्रयोगशाळा नमुने घेत नाहीत. रुग्णालयावर इतका दबाव आहे की, ते वेळेवर रिपोर्ट देऊ शकत नाही. स्मशानभूमीच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. रुग्णालयातील बेडसाठी मारामारी सुरु आहे. मात्र, कोणत्याही राजकीय नेत्यांच्या कानावर, धार्मिक नेत्यांच्या कानावर काहीच पडत नाही.
प्रचारसभांवर टीका
परकला प्रभाकर म्हणतात टीव्हीवर पाहायला मिळायचं मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कशा सभा घ्यायचे. लोक गोळा करायचे. कुंभमेळा सुरु आहे. आणि नंतर परिस्थिती बिघडल्यानंतर त्यांच्या लक्षात येते. हद्द तर तेव्हा होते, जेव्हा काही तज्ज्ञ लोक या सर्व गोष्टीला योग्य बोलतात. हे लोक दुसऱ्या देशाच्या तुलनेत आपली स्थिती चांगली असल्याचं सांगतात. हे ऐकूण अधिक वाईट वाटलं.
कोरोनाची लाट आता थांबणार नाही. त्यासाठी 140 कोटी लसींची गरज आहे. ज्या वेळेत रुग्णालय सुधारण्यासाठी, पायाभूत सुविधा वाढवायला हव्या होत्या. त्या काळात टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या गेल्या.
मोदींना सल्ला...
देशासमोर जास्त दिवस गप्प राहून चालणार नाही. मानवता, पारदर्शकता आणि जनतेच्या प्रती उत्तरदायीत्व हेच टीकाऊ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्ताच योग्य आचरण करणं गरजेचं आहे. सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरकार देऊ इच्छित नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी चांगला सल्ला दिला होता. त्याला मोदी सरकारने अयोग्य पद्धतीने उत्तर दिलं. असं परकला प्रभाकर यांनी म्हटलं आहे.