नऊ वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांची ओळख पटली, प्रत्यक्षदर्शींची न्यायालयात साक्ष

अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे नरेंद्र दोभाळकर यांच्या हत्येला 9 वर्षे पुर्ण होत आहेत. मात्र अजूनही खून्यांचा शोध लागला नव्हता. मात्र प्रत्यक्षदर्शींनी न्यायालयात दिलेल्या साक्षीमुळे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून्यांची साक्ष पटली आहे.;

Update: 2022-03-20 02:51 GMT

20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणातील खून्यांना शोधण्यात महाराष्ट्र पोलिस आणि सीबीआयला यश आले नव्हते. मात्र अखेर नऊ वर्षानंतर प्रत्यक्षदर्शींनी न्यायालयात दिलेल्या साक्षीनुसार डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करणाऱ्या खुन्यांची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात सचिन आंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर आरोप आहे. तर सचिन आंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळीबार करून ते पळून गेल्याची माहिती त्यावेळी पुलावर उपस्थित असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी दिली.

20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या त्यावेळी महापालिकेचे सफाई कर्मचारी असलेला एक पुरूष आणि स्री पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी एका झाडावर माकड आले. त्यामुळे त्या ठिकाणी कावळ्यांचा आवाज झाला म्हणून आम्ही तिकडे पाहत होतो. तेवढ्यात दोन व्यक्ती दुचाकीवरून आल्या आणि त्यांनी एका व्यक्तीला गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला.तर आरोपी पोलिस स्टेशनच्या दिशेने पळाले. त्यानंतर आम्ही आमच्या कामासाठी निघून गेलो. तर ते आरोपी सचिन आंदुरे आणि शरद कळसकर असल्याची साक्ष साक्षीदारांनी न्यायालयात दिली. त्यामुळे या प्रकरणाचा तिढा सोडवण्यास मदत होऊन लवकरच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खून्यांना शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच 23 मार्च रोजी पुढील सुनावणी पार होणार आहे. त्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून प्रकाश सुर्यवंशी तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कुटूंबियांकडून adv. ओंकार नेवगी यांनी कामकाज पाहिले. तर विरेंद्र इचलकरंजीकर यांनी बचाव पक्षाची बाजू मांडली. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. 

Tags:    

Similar News