खा. संजय राऊत यांचा ऐकरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका
खासदार संजय राऊत यांचा ऐकरी उल्लेख करत माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलंय.;
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल नितेश राणे यांच्यावर टीकेला प्रतिउत्तर देतांना 'महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) असं म्हटलं होतं. आता यावरून राणे आणि राऊत यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ऐकरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, 'हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत.' असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.
हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 2, 2021
त्यांच्या या ट्विटनंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निलेश राणे यांच्या या ट्विटला आता शिवसेनेकडून काय प्रतिउत्तर येत हे पाहणं महत्वाचं आहे.