शरद पवारांनी सरकार पडणार नाही असे जरी म्हटले असले तरी पवारच सरकार पाडतील - राणे

Update: 2021-10-14 01:14 GMT

राज्य सरकारने शेतकरी आणि पूरग्रस्तांना जरी पॅकेज जाहीर केलं असेल तरीसुद्धा कोकण आणि मराठवाडा हे प्रतीक्षेतच आहेत यांना एकही रुपया मिळाला नाही कॅबिनेटमध्ये निधी जाहीर झाला, परंतु तो हेक्टरी किती मिळणार? हे अजून स्पष्ट नाही. यांचा हवेत गोळीबार असून जमिनीवर काही नसतं याचा मला अनुभव आहे असा घणाघात भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे.

कोकणावर संकट आले त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व आता मराठवाडावर संकट येऊन विदर्भावर संकट आले यात शेतकरी उद्ध्वस्त झाला यात एक सुद्धा पैसा माझ्या तरी मतदार संघात तरी मिळाला नाही असं राणे म्हणाले.

सरकारचा दुटप्पीपणा हा आताचा नाही , मागच्या वर्षी देखील थेएटरला परवानगी नाही तरीसुद्धा दसरा मेळावा थेएटरला झाला त्यांना लोकांचं काही पडलेला नाही तसेच शेतकऱ्यांचं देखील नाही अशी टीका राणेंनी केली.

महाराष्ट्रात एक वर्गही सुखी नाही विद्यार्थ्यांच्या परीक्षेत देखील घोळ झालेला आहे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांचं कुलगुरू ऐकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांचे सर्वच नेते कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकलेल्या आहेत त्यात नवाब मलिक, धनंजय मुंडे सोबत ठाण्यातले जितेंद्र आव्हाड देखील आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत

पवारांनी सरकार पडणार नाही असे जरी म्हटले असले तरी पवारच सरकार पाडतील आणि पडणार नाही म्हटल्यावर म्हणजे शंभर टक्के पडणार, येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा जोर हा असणारच आहे आणि हे येणाऱ्या काळात दिसेलच असही राणे म्हणाले.

Tags:    

Similar News