कोरोना निर्बंध : मुंबईत नाईट कर्फ्यू

Update: 2021-03-27 14:31 GMT

मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता मोठा निर्णय़ घेतला आहे. मुंबईत आता रात्री 8 ते सकाळी 7 नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्याने, बीच रात्री 8 वाजेनंतर बंद राहतील. तर मॉल्स, हॉटेल आणि रेस्टॉरंटही रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचबरोबर 27 मार्चपासून ते 15 एप्रिलपर्यंत जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. पाचच्या वर लोकांना आता एकत्र जमता येणार नाही.

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे पालन नीट न केल्यास कठोर निर्बंध लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतरही राज्यभरात नागरिका नियम पाळताना दिसत नसल्याने अखेर सरकारने कठोर निर्णय घेतला आहे.

कडक निर्बंध

सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी फेस मास्क अनिवार्य

सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे अनिवार्य

दुकानांमध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही

सार्वजनिक थुंकल्यास दंड होणार

सार्वजनिक ठिकाणी दारु पिणे, पान, गुटखा, तंबाकू खाण्यास मनाई

Tags:    

Similar News