सचिन वाझे प्रकरणाला वेगळे वळण, NIA चे महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली
सचिन वाझे प्रकरणाला वेगळे वळण, NIA चे महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली...;
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. या दोनही प्रकरणात सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास NIA संस्था करत आहे. मात्र, या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. एनआयएचे महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला यांची बदली मिझोराम येथे करण्यात आली आहे.
दरम्यान इतक्या संवेदनशिल प्रकरणातील अधिकाऱ्यांची अशा प्रकारे तात्काळ बदली करण्यात येत नाही. मात्र, अनिल शुक्ला यांची बदली झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारीला स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्या होत्या. ही गाडी ज्या मनसुख हिरेन यांची होती त्यांचीही हत्या करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात सचिन वाझे मुख्य आरोपी आहेत. आणि या प्रकरणाील एनआयएचे महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळं नक्की या प्रकरणात पुढे काय होणार? याबाबत चर्चा सुरु आहे.