भीमा कोरेगाव इथल्या दंगलीला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. NIA ने या प्रकऱणात देशद्रोहाच्या आरोपासह १७ गंभीर आरोपांचा प्रस्तान विशेष न्यायालयापुढे ठेवला आहे. यामधील काही आरोप सिद्ध झाल्यास मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. आता या आरोपांच्या प्रस्तावावर NIA विशेष कोर्ट काय निर्णय देते ते पाहणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणातील १६ आरोपी सध्या तुरुंगात आहेत तर ५ फरार आहेत. या सर्व आरोपींविरोधात NIAने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कटाचा उल्लेख नाही
२०१९मध्ये पुणे पोलिसांनी याप्रकरणात पंतप्रधान मोदींएल्गार परिषद प्रकरण: मोदींच्या हत्येच्या कटाचा उल्लेख NIAने टाळलाच्या हत्येचा कट आरोपी रचत असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला होता. पण NIAने दाखल केलेल्या आपल्या प्रस्तावात या आरोपाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याऐवजी लोकसेवकाच्या हत्येचा कट रचण्यात येत होता, असा उल्लेख NIAने केला आहे. तसेच देशाविरुद्ध सशस्त्र उठाव करुन सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न होता असाही आरोप NIAने केलेला आहे. हा कट यशस्वी करण्यासाठी पुण्यात कबीर कला मंचच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेतून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव आखण्यात आला होता, असाही दावा NIAने केला आहे. त्यानंतर भीमा कोरोगाव इथे जातीय दंगल झाली आणि यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तसेच महाराष्ट्रातही काही ठिकाणी दंगल झाली, असा आरोप NIAने केला होता.
या प्रकरणातील एक आरोपी स्टॅन स्वामी यांच्या निधनानंतर इतर आरोपींना सोडण्याची मागणी जोर धरत असताना NIAने या आरोपांचा प्रस्ताव ठेवला आहे. NIAने आरोपांचा आधार रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या कॉम्प्युटरमध्ये सापडलेली काही माहिती असल्याचे सांगितले आहे. पण ही माहिती या दोघांच्या कॉम्प्युटरमध्ये त्यांच्या अटकेच्या आधी टाकण्यात आली होती, असा दावा अमेरिकेतील एका आयटी कंपनीने केला आहे. या माहितीच्या आधारे गडलिंग यांनी हायकोर्टात धाव घेऊन आरोप रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवरील निर्णय अजून झालेला नाही.