NBDSA चा गोदी मीडियाला दणका, News 18 ला ठोठावला दंड
टीव्ही डिबेटमध्ये निष्पक्षता आणि तटस्थता यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अॅथोरिटी (National broadcasting and digital Authority)ने गोदी मीडियाला चांगलाच दणका दिला आहे.
न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटस स्टँडर्ड्स अॅथोरिटी (News Broadcasting And Standards authority) ने कर्नाटक हिजाब (Hijab row) प्रकरणाशी संबंधीत आयोजित केलेल्या न्यूज 18 (News18) वरील टीव्ही डिबेटमध्ये निष्पक्षता आणि तटस्थता या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी न्यूज 18 चॅनलला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या डिबेटचे अँकर गोदी मीडियाचे अमन चोप्रा (Aman Chopra) होते.
यासंदर्भात न्यायमुर्ती ए के सिकरी (Justice Ak Sikri) यांनी निर्णय देतांना म्हटले की, हिजाब प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने (karnatak High court) निर्णय दिल्यानंतर मीडियाला या मुद्द्यावर चर्चा करण्याचा अधिकार होता. मात्र न्यूज 18 चे अँकर अमन चोप्रा यांनी या डिबेटला सांप्रदायिक आधार दिला. या चर्चेत अमन चोप्रा यांनी 6 एप्रिल रोजी न्यूज 18 च्या डिबेटमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना 'हिजाबी गँग' (Hijabi Gang) 'हिजाबवाला गजवा' (Hijabwala Gajva) असे म्हटल्याचा आरोप तक्रारकर्ता इंद्रजीत घोरपडे (Indrajeet Ghorpade) यांनी केला होता. तसेच या डिबेटमध्ये अल कायदा प्रमुख, जवाहिरी हिजाब समर्थनाच्या आंदोलनाचा चेहरा होता आणि हिजाब घेणाऱ्या विद्यार्थीनी या आंदोलनाचा मुखावटा असल्याचेही म्हटल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच न्यूज 18 ने रिपोर्ट कव्हर करताना NBDSA च्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. मात्र या आरोपांवरून बचाव करताना न्यूज 18 ने युक्तीवाद करताना म्हटले की, आम्ही डिबेटच्या माध्यमातून अशा प्रकारच्या तथ्यांचा रिपोर्ट व्यापक रुपाने उपलब्ध होते. त्यावरून हिजाब प्रकरणात चर्चा घडवून आणली होती. तसेच न्यूज 18 हा एक जिम्मेदार चॅनल आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभुमीसह जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या महत्वाच्या विषयांवर मत व्यक्त करण्यासाठी न्यूज 18 चर्चा घडवून आणत असते. त्यानुसार हिजाब प्रकरणावर संतुलित चर्चा घडवून आणली.
यानंतर आचारसंहिता आणि प्रसारणाबाबत नियमांचे पालन केले की नाही? असा प्रश्न NBDSA विचारला. त्यानंतर NBDSA ने या मुद्द्याची पडताळणी केली असता त्यामध्ये या चर्चेला सांप्रदायिक वळण दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायमुर्ती सिकरी यांच्या निर्णयानुसार न्यूज 18 ने डिबेटमध्ये जवाहिरीसोबत जे लोक हिजाब परिधान करण्याच्या बाजूने बोलणारे आणि जवाहिरी गिरोहचे सदस्य आणि जवाहिरी चे राजदूत असल्याचा त्यांनी वारंवार प्रचार केला. त्यामध्ये जवाहिरी आपला देव असल्याचे म्हटले. या गोष्टीला न्यायमुर्ती सिकरी यांनी अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे म्हटले. त्याबरोबरच गोदी मीडियाचे अँकर अमन चोप्रा यांनी केवळ नियमांचे उल्लंघन केले नाही तर त्यांनी निलेश नवलखा विरुध्द भारत सरकार (Nilesh Navalakha Vs indian state) संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलेल्या निकालाचे पालन केले नाही. जो अँकर आपल्य मनानुसार प्रसारण नियमांचे पालन करणे आणि थांबवणे थांबवण्याविषयी सांगतो. मात्र आदेशात पुढे असंही म्हटले आहे की, अँकरने केवळ पॅनलिस्टला मर्यादा पार करण्यापासून थांबवले नाही तर सांप्रदायिक विचार व्यक्त करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला. ज्यामुळे समाजातील शांतता भंग होऊ शकते. या घटनेकडे पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्याच्या दृष्टीकोणातूनही आपण पाहू शकतो. त्यामुळे NBDSA ने चॅनलला अशा प्रकारच्या चर्चा घडवून आणण्याबाबत इशारा दिला आहे. त्याबरोबरच 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
NBDSA ने अशा प्रकारच्या टीव्ही डिबेट सात दिवसांच्या आत चॅनलवरून हटवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा सांप्रदायिक चर्चा घडवून सामाजिक वातावरण गढूळ करणाऱ्या गोदी मीडियाला मोठा दणका मानला जात आहे.