नवे संसद भवन आणि एक अकेला मोदी
गेल्या काही दिवसांपासून नव्या संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमावरून वाद सुरु आहे. देशातील प्रमुख 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर हा कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्याभोवतीच आखण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत बोलताना एक अकेला मोदी कितनों पर भारी पड रहा है, असं वक्तव्य केलं होतं. मात्र त्याच प्रमाणे नव्या संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमात सगळीकडे पंतप्रधान मोदी हेच केंद्रस्थानी आहेत.
तामिळनाडूतील संतांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे सेंगोल सुपूर्द केला.त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला सेंगोलची प्रतिष्ठापणा केली.
त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्वधर्म प्रार्थना सभेला उपस्थिती लावली.
या सगळ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावरच कॅमेरे असल्याचे दिसून आले. त्यामुळे नवे संसद भवन आणि एक अकेला मोदी हेच या इव्हेंटच्या माध्यमातून दिसून आल्याची चर्चा देशभर रंगली आहे.
विरोधी पक्षांचा बहिष्कार का?
नव्या संसदेचे उद्घाटन हे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नाही तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, असं मत व्यक्त केलं होतं. पण सरकार हे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यावर ठाम राहिले. त्यामुळे मोदी सरकार लोकशाही मुल्यांना पायदळी तुडवत असल्याची टीका करत देशातील 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.