महाराष्ट्रावर भारनियमनाचं नवं संकट? सर्वात मोठ्या वीज प्रकल्पातून केवळ 10 टक्के वीज निर्मिती
रत्नागिरी : महाराष्ट्रासमोर आता नवं संकट आलं आहे. ते म्हणजे राज्यावर भारनियमनाचं वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील 2000 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेच्या प्रकल्पातून केवळ 200 मेगावॅट वीज निर्मिती सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राला भारनियमनाच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतून 2200 मेगावॅट ऐवजी फक्त 200 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे असल्याची माहिती समोर येत आहे. अपुऱ्या गॅसपुरवठ्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे.परिणामी महाराष्ट्रात भारनियमन होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्वात मोठा वीज निर्मिती प्रकल्प अंजनवेल येथील प्रकल्पाची ओळख आहे. यावर आता राज्य सरकार कसा मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे. त्यातच महावितरणची थकबाकी 70 हजार कोटींच्या वर गेली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या डोक्यावर थकीत वीज बिलांचा वसुलीचा प्रश्न उभा राहिला आहे. ही थकबाकी वसूल होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता भटकर यांनी थकबाकीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज बिलांची रक्कम तात्काळ वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.