आता परमबीर सिंहावरच नवा लेटरबॉम्ब

पोलिस अधिकारी सचिन वाझेवरुन विधीमंडळाचं कामकाज गाजल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयु्क्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमधून गृहमंत्र्यांनाच लक्ष केल्यानंतर आता एका पोलिस अधिकाऱ्यानं लेटर बॉम्ब देत परमबीर सिंह यांनाच अडचणीत आणले आहे. चुकीचे आदेश न पळणा-या पोलीस अधिका-यांना परमवीर सिंगानी १४३ पोलीस अधिका-यांना करीअर बरबाद केल्याची कागदपत्रे पुढे आली असून भाजप सरकारच्याच आर्शिवादाने त्यांना क्लिन चिट मिळत असल्याचा आरोप गावदेवी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला आहे.

Update: 2021-03-21 12:59 GMT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांच्या गृहमत्र्यांवरील आरोपामुळे रण पेटलेले असताना आपल्या बेकायदेशीर आदेशाचे पालन न करणा-या पोलीस अधिका-यांना खोटया गुन्ह्यांमध्ये अडकवुन कारागॄहात डांबण्याचा सिलसिलाच परमबीर सिंह ह्यांनी चालविला होता. त्यांच्या चुकीच्या आदेशाचे पालन न करणा-या पोलीस अधिका-यांनी जेल भोगल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. रक्षक असणारे परमवीरसिंग भक्षक म्हणुन वागत असताना त्यांना वाचविण्यासाठी भाजप सरकारने क्लिन चिट दिल्या होत्या असा आरोप करण्यात आला आहे

मुंबई पोलीसांची प्रतिमा सध्या मलीन होत असताना आपल्यावर चौकशीचा ससेमिरा येऊ नये ह्याकरीता मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झाल्यावर परमबीर सिंह ह्यांनी सचिन वाझेकडे गॄहमंत्र्यानी १०० कोटी प्रतिमाह कमाई करुन मिळण्याची मागणी केल्याचे सही नसलेले पत्र ई-मेल करुन वादाला पेव फ़ोडले आहेत. परंतु आजतागायत तब्बल १४३ पोलीस अधिका-यांना त्यांच्या आयुष्याचे वाटोळे करत त्यांची पोलीसी कारकिर्द धोक्यात आणण्याचा प्रकार परमबीर सिंह ह्यांनी केल्याचे समजते.

कोणत्याही श्रीमंताविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्याबाबत गुन्हा खोटा असल्याचे वा गैरसमजातुन दाखल झाला असल्याचा अहवाल आपल्या कनिष्ठ अधिका-यांवर दबाव आणुन न्यायालयात सादर करत ख-या आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न करताना खोटे गुन्हे नोंदवुन पोलीस अधिका-यांचे आयुष्य उध्दवस्त करण्याचा प्रकार परमबीर सिंह ह्यांनी केलेला आहे.


मुंबईतील बहुचर्चित प्राव्होग कंपनीचे संचालक सलील चर्तुवेदी ह्यांच्यावर अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग म्हणुन कार्यरत असताना विमानतळ पोलीस स्टेशनला एन.डी.पी..एस.चा खोटा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यामध्ये परमवीर सिंग आरोपी असताना विमानतळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन सिनियर पी.आय. मधुकर गाताडे व पी.आय. सुभाष शंकर केंजळे, सलील चर्तुवेदी ह्यांच्यावर दोषारोप दाखल करण्यात आले. मुंबई सेशन कोर्टाने खटल्याचा निकाल देताना गुन्हा नोंदवुन तपास करण्यापर्यतच्या सर्व कार्यपध्दतीवर ताशेरे ओढत सर्वांना निर्दोष मुक्त केले, परंतु सदर प्रकरणी कोर्टाच्या आदेशाने नोंद झालेल्या गुन्ह्यामध्ये व खातेनिहाय चौकशीमध्ये अप्पर मुख्य सचिव ह्यांना सादर झालेल्या अप्पर पोलीस महासंचालकाच्या अहवालामध्ये श्री. परमवीर सिंग दोषी असल्याचे आढळुन आलेले आहे. परंतु त्यांना भाजप सरकारने क्लिन चिट दिलेली होती. ठाणे शहर पोलीस आयुक्तपददेखील त्यांना तत्कालिन मुख्यमंत्री देवेद्र फ़डणवीस ह्यांच्या आर्शिवादानेच मिळालेले होते असे म्हटले जाते.

आपल्या चुकीच्या आदेशाचे पालन न करणा-या कळव्यातील ट्रफ़िक विभागाच्या एसीपी शामकुमार निपुंगे ह्यांच्यावर एका महीला पोलीस कर्मचा-यास आत्महत्येला प्रवॄत्त केल्याबाबत खोटा गुन्हा नोंदवुन ६ महीने जेलमध्ये डांबण्यात आलेले होते. विशेष म्हणजे व्रजासनामध्ये बसुन अशक्यप्राय अशी आत्महत्या केलेल्या महीला पोलीस कर्मचा-याच्या आकस्मिक मृत्युची नोंद न करता थेट नावानिशी निपुंगेवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. चार्जशिट फ़ाईल करताना महत्वपुर्ण कागदपत्रे सादर न करणा-या पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशाचे कागदपत्रे सादर न करण्याबाबत खुलासा सादर करण्यामध्ये देखील कुचराई केलेली आहे. निपुंगेचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांना तळोजा जेलमध्ये सर्वसामान्य केदयांची वागणुक देताना न्यायालयापुढे त्यांनी मयत पोलीस कर्मचा-यास फ़ोन केलेले नसतानाही फ़ोन करुन त्रास दिल्याचे लेखी कथन परमबीर सिंह ह्यांच्या आदेशाने करण्यात आलेले आहे.

परमबीर सिंह ह्यांचे आदेश पाळले नाही तर कार्यवाही होण्याच्या भितीने पोलीस अधिकारी चुकीचे काम करत आलेले आहेत. त्यामुळे अनेकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागलेले आहे. वझीर शेख नामक एका पोलीस अधिका-याने परमबीर सिंह व तेलगी ह्यांचे एकाच स्टेजवरील फ़ोटोचे प्रदर्शन करुन सलमान खानच्या वडीलांच्या गुन्ह्यापासुन ममता कुलकर्णीच्या गुन्ह्यापर्यत असलेल्या परमबीर सिंह ह्यांच्या अधिकार व पदाच्या दुरुपयोगापर्यत सर्वांना माहीत आहे.

Delete Edit

परमबीर सिंह ह्यांच्या चुकीच्या आदेशाचे पालन न करणा-या कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनला असलेल्या पी.आय. घाडगे ह्यांच्यावर पुंगळीसह गोळीबार केल्याचा खोटा गुन्हा त्यांना सव्वा वर्षे जेलमध्ये डांबताना त्यांच्यावर अवघ्या १० दिवसांत तेच कार्यरत असलेल्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये ४ खोटे गुन्हे नोंदविण्यात आले, त्यांच्या पत्नीलादेखील जेलमध्ये टाकण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्या ३०७ च्या गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्त करताना तपास यंत्रणेबाबत ताशेरे ओढले आहेत. शिवाय पुंगळीसह गोळी झाडली जात नाही हे लहान मुलालादेखील कळत असताना पुंगळीसह गोळी झाडली गेल्याचा अहवाल हत्यार न पहाता न्यायालयात सादर करण्यात आलेला होता. कडोमपाच्या माजी आयुक्तांनी केलेल्या टीडीआर घोटाळ्याप्रकरणी गुन्हाच घडला नसल्याचा अहवाल तसेच बिल्डर मंडळीच्या फ़सवणूकीबाबत त्यांना क्लिन चिट देताना नरेश चडडी ह्या गुडाच्या हत्येप्रकरणी उल्हासनगरमधील एका व्यावसायिक माजी नगरसेवकाविरोधात आमच्याकडुन चुकीचा गुन्हा नोंदविला गेला होता असा अहवाल परमवीर सिंग ह्यांच्या आदेशाने सादर करण्यात आला.

पी.आय. घाडगेंची न्यायालयीन कामे हाताळणा-या वकीलालादेखील तडीपार गुंडाचा सहारा घेऊन बनावट कागदपत्रे बनविल्याच्या खोटया आरोपाखाली जेलध्ये डांबण्यात आलेले होते. तडीपार गुंडाला बेतुरकरपाडयातुन अटक करताना त्याचे मोबाईल लोकेशन मात्र पोलीस स्टेशनच्या नजीक असल्याचे तसेच त्याला पकडण्यास गेलेले पोलीस बेतुरकरपाडयाला गेलेच नसल्याचे दिसुन आलेले आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी परमबीर सिंह ह्यांना मुंबईचे पोलीस आयुक्तपद देऊ नये ह्याकरीता पत्रक दिल्यावर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली, शिवाय मुंबईच्या डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनचे एपीआय डांगे ह्यांनी चुकीचे आदेश पाळले नाहीत म्हणुन त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली गेली.

आपले आदेश न पाळणा-यांना अडकवणा-या परमबीर सिंह ह्यांनी मात्र आत्ता सचिन वाझेच्या खांद्यावर बंदुक ठेऊन थेट गॄहमंत्र्यावरच गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ह्यापुर्वी परमबीर सिंह ह्यांनी बळी घेतलेल्या निरपराधाची कहाणी लोकांसमोर येणार आहे. आत्ता तरी त्यांना न्याय मिळेल की नाही हे सांगता येणारे नाही.

Tags:    

Similar News