मुंबईकरांना दिलासा, 24 तासात नवीन रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त

Update: 2021-04-26 16:07 GMT

मुंबईत लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनचे परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांचे आकडे आता कमी होऊ लागले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 3 हजार 876 रुग्ण आढळले आहेत. तर दिलासादायक म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 150 एवढी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 46 हजार 861 एवढी झाली आहे. मुंबईत रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के एवढे झाले आहे. तर 70 हजार 373 रुग्ण सध्या एक्टिव्ह आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आणखी वाढून 62 दिवसांवर गेला आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेला सोमवारी कोरोनावरील लसीचे दीड लाख डोस मिळाले आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. यातून पुढचे तीन दिवस लसीकरण होऊ शकणार आहे. त्यामुळे आता ज्यांचा दुसरा डोस घ्यायचा राहिला आहे

Tags:    

Similar News