हात जोडतो.. दुखणी अंगावर काढू नका :आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कळकळीचे आवाहन
कोरोनै़ाची कुठलीही लक्षणे दिसली तर ताबडतोब तपासणी करून घ्या दुखणी अंगावर काढू नका, उशीर झाल्याने पेशंट गेला हा अनुभव मला सर्व जिल्ह्यांमध्ये येत आहेत, असं कळकळीचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका महाराष्ट्राला बसला असून देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास ताबडतोब तपासणी केली पाहिजे कुठल्याही दुखणं अंगावर काढणे म्हणजे धोकादायक आहे. अंगावर दुखणे काढलेले पेशंट नंतर सिरीयस होतात आणि दगावतात असंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. सध्या पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे एक एप्रिलपासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. राज्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मिशन ब्रेक द चैन हा कार्यक्रम सुरू केला असून अनेक ठिकाणी निर्बंध घातले आहे नागरिकांनी या निर्बंध त्यांच्या सुरक्षितेसाठी आहेत, असे मानून सहकार्य करावे असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.