मारिया तू योग्य होतीस, आम्ही सचिनला ओळखत नाही; माफ कर...

Update: 2021-02-05 14:36 GMT

क्रिकेटचा देव मानला गेलेल्या सचिन तेंडुलकरने शेतकरी विरोध टि्वट केल्यानंतर चहुबाजूने त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला आहे. अनेक भारतीय युझर्सने रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची माफी मागितली आहे. मारियाला २०१५ साली भारतीयांनी सचिनला ओळखत नसल्या बद्दल ट्रोल केले होते.

शेतकरी आंदोलनाला परदेशातून पाठिंबा वाढल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने परिपत्रक काढून अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असे सुचवले होते.देशातील शेतकरी आंदोलनाला परदेशातील अनेकांनी पाठिंबा दिल्यानंतर भारतातील सिनेस्टार, खेळाडू आणि अन्य प्रसिद्ध व्यक्तींनीएकाच वेळी आणि साम्य असलेली जाहीरपणे मतं ट्विटरच्या माध्यमातून मांडली होती. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा देखील समावेश होता.


पण सचिनने देशाच्या सार्वभौमत्वबद्दल मत व्यक्त केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीकेचा धनी झाला करण्यास सुरुवात केली. सचिनवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना एका भारतीय युझरने रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा ची माफी मागितली आहे. यामध्ये अनेक केरळी नागरिकांचा समावेश आहे.

आता सचिनच्या ट्वीटचा आणि मारियाचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडले. मारियाने २०१५ साली एका मुलाखतीत सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे म्हटले होते. तेव्हा भारतीय लोकांनी तिच्यावर बरीच टीका केली होती.

आता एका भारतीय युझरने तिची त्या घटनेबद्दल माफी मागितली आहे. या युझरच्या मते, तू जेव्हा सचिनला ओळखत नाही असे म्हणाली होतीस तेव्हा आम्ही तुझ्यावर टीका केली होती. पण आता हे सिद्ध झाले आहे की सचिन विषयी एखाद्याला माहिती नसावी. तू बरोबर होतीस, आम्ही तुझी माफी मागतो. आम्ही ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलो यासाठी... तू बरोबर होती, आम्हाला माहिती नाही की सचिन कोण आहे. गेली दोन दिवस सचिनवर सोशलमीडियामधून टीकेचा भडिमार होत असून त्याने यावर कुठलीही अद्यापपर्यंत प्रतिक्रिया दिली नाही.

Tags:    

Similar News