भारतीय पत्रकाराचा अफगाणिस्तानात मृत्यू, पंतप्रधान मोदींचा शोक संदेश नाहीच

Update: 2021-07-17 04:08 GMT

पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानात मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानचे लष्कर आणि तालिबानी यांच्या संघर्षात दानिश यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाल आहे. दानिश सिद्दीकी यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूनंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी @narendramodi किंवा पंतप्रधान कार्यालयानेही @PMOIndia यावर ट्विट करुन कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधान मोदी यांना सिद्दीकी यांच्या निधनावर शोक व्यक्त कऱण्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाही, अशी टीका आता सोशल मीडियावर केली जात आहे. एरवी देशातील कोणत्याही मोठ्या दुर्घटना, कुणाचे निधन यावर तातडीने ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दानिश सिद्दीकी यांच्याबद्दल एक वक्तव्य किंवा एक ट्विट केलेले नाही.

अमेरिकेने अधिकृतपणे सिद्दीकी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. रॉयटर्सचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानातील संघर्षात मृत्यू झाला, ही अत्यंत दु:खदायक बाब आहे, अशी प्रतिक्रिया बायडेन प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. अमेरिकेसारख्या शक्तीशाली देशाने दानिश सिद्दीकी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पण पंतप्रधान कार्यालय @PMOIndia आणि नरेंद्र मोदी @narendramodi यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जगभरातील विविध देशांच्या प्रमुखांनी दानिश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. पण पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्र्यांनी ट्विट केलेले नाही, अशी टीका पत्रकार साकेत गोखले यांनी केली आहे.

Tags:    

Similar News