निलंगा राईस प्लेट खायला लोकांची गर्दी

Neelanga Rice Plate

Update: 2024-02-04 05:32 GMT

हॉटेलात गेल्यास वेगवेगळ्या प्रकारचा राईस खायला मिळतो. त्यामध्ये जिरा राईस,साधा राईस यांचा समावेश होतो. त्याचबरोबर हॉटेलात राईस प्लेट देखील खायला मिळते. परंतु लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात असणाऱ्या निलंगा राईस प्लेट ची अनोखी चव असून राईस खाण्यासाठी लोकांची गर्दी असते. छोट्याशा हॉटेलात सुरुवात केलेल्या या व्यवसायाची आज हजारो रुपयात उलाढाल होत आहे.

या व्यसायची सुरुवात सिद्राम आवले यांनी 1987 साली निलंगा शहरात केली. त्यांच्या हॉटेल चे नाव वाल्मिकी टी हाऊस आणि निलंगा राईस असे असून ते एस टी स्टँड च्या बाजूला आहे. सुरुवातीला एका छोट्याशा हॉटेलमध्ये राईस बनवण्यास सुरुवात केली. 1987 साली सुरुवातीच्या काळामध्ये महागाई कमी असल्यामुळे राईस हा स्वस्त होता. पूर्वी 25 पैसे प्लेट विकली जात होती. परंतु जशी महागाई वाढत गेली तसे राईस प्लेटचे भाव वाढत गेले. या हाॅटेलचे मालक सिद्राम आवले यांचा मुलगा सुनील आवले नातू विशाल आवले आजही निलंगा राईस बनवतात. हा राईस लोकांना खूप आवड असून राईस चमचमीत व स्वादिष्ट असतो. त्यामुळे त्यांच्याकडे राईस खाण्यासाठी खूप गर्दी असते. 26 किलो राईस बनवायला दीड तास लागत असून त्यामध्ये आठ किलो कांदे,टमाटे,तेल,दोन किलो बटाटे,कोथिंबीरच्या दोन पेंड्या एवढे साहित्य लागते. त्यामुळे राईस चविष्ट होत असून आमच्या इथला राईस खाल्लेला ग्राहक परत दुसरीकडे राईस खात नाही. तो याच हॉटेलमध्ये येऊनच राईस खातो. असे हॉटेलचे मालक सांगतात.




 


निलंगा राईस ची टेस्टच न्यारी

मी कर्नाटकचा असून माझ्या व्यवसायानिमित्त मला लातूरला यावे-जावे लागते. लातूरला जाण्यासाठी निलंग्यावरून जावे लागते. निलंग्या मध्ये मोठे-मोठे हॉटेल्स आहेत. पण मी वाल्मिकी राईस मध्येच येवून राईस खातो. कारण त्याची चव वेगळी आहे. या राईसची टेस्ट वेगळी असल्यामुळे मी येथे आवर्जून येऊन राईस हा खातोच. असे ग्राहक नवनाथ विश्वनाथ बापले सांगतात.




 


नीलंग्याचा आलूभात फेमस

निलंग्याचा अलूभात फेमस असून मी रोजच इथे राईस खातो. या राईस वर लिंबू पिळून खाल्ल्यावर त्याची चवच वेगळी आहे. हा राईस चविष्ट असून खाण्यास खूपच मजा येते. म्हणूनच इथला राईस हा फेमस आहे. ग्राहक धनराज मंठाळे सांगतात.




 


निलंगा राईस शिजवण्यास सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात होते. हा राईस मुंबई-पुणे सह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये निलंगा राईस या नावाने ओळखला जातोय.



Tags:    

Similar News