राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांच्या अडचणीत वाढ ; बलात्कार प्रकरणाची पुन्हा चौकशीचे कोर्टाचे आदेश
बलात्कार प्रकरणातील पोलिसांनी सादर केलेला बी समरी रिपोर्ट न्यायालयाने रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या अडचणी वाढल्याचे बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी
माध्यमांना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणाले की, पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. मी पुन्हा चौकशीला सामोरं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. या आरोपांनतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने 23 सप्टेंबर रोजी या प्रकरणात सादर केलेला बी समरी रिपोर्ट अमान्य केला आहे. सोबतच पोलिसांना पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश दिले. फेर चौकशीला मी सामोरे जाईल त्यानंतर पोलीस अहवाल करतील," अशी प्रतिक्रिया शेख यांनी दिली.