आज सकाळीच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे ईडीच्याच्या रडारवर आले आहेत नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं.ईडी कोठ़ीडीत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इब्राहिम कासकर याने नबाव मलिक यांचे नाव घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.यामुळे नबाव मलिक यांची ईडीकडुन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
नवाब मलिक यांच्या भावासही ईडी ने समन्स बजावले होते.अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरोधातील मनी लॉंड्रींग प्रकरणी ईडी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांची चौकशी करत आहे. आज सकाळी ७ वाजता मलिक यांना त्यांच्या घरातून ईडी अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन नेले. हवाला प्रकरणात एजन्सीने गोळा केलेल्या गुप्तचर माहितीमध्ये मलिक यांचे नाव प्रथम आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ईडीच्या या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला असुन आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने ईडीच्य़ा कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे.नवाब मलिक एनसीबी विरोधात आवाज उठवत होते तेव्हाच त्यांनी ट्विट केलं होतं की माझ्या घरी पाहुणे येणार आहेत. आज ते पाहुणे आले आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. भाजप नेत्यांविरोधात ईडीच्या नोटिसीचे काय झाले? नारायण राणे, बबनराव पाचपुते यांच्यासह इतर नेत्यांविरोधातील तक्रारीचे काय झाले? असा सवाल राष्ट्रवादी युवा काँग्रेसने केला आहे. 'आम्ही येत आहोत, अडवून दाखवा' अशा इशारासुद्धा राष्ट्रवादीने दिला होता.