पाचोरा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर निवडणूक लढविणार - विकास पाटील

Update: 2021-11-09 13:04 GMT

पाचोरा// राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय क्षेत्रात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. पाचोरा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी लढविण्यासाठी अनेक भागात इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. या निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या रूपाने एकत्र असताना पुढच्या निवडणूकांची गणितं कशी जुळणार? हा प्रश्न वर्षभरापासून विचारला जातोय. महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढलेली विधानपरिषदेची पहिली निवडणूक होती.

त्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. यानिमित्ताने बोलताना पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष व नगरसेवक विकास पाटील यांनी म्हटलं की, "यापुढे पाचोरा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर निवडणूक लढविणार आहे आणि पाचोरा नगरपालिकेत ३१ जागेवर उमेदवार देणार असून नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकीकडे शिवसेना नेते एकत्रित निवडणूक लढवण्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र शिवसेनेच्या या मताशी सहमत नसल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी आमदार दिलीप वाघ, गट नेते संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे.

पदाधिकारी यांनी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे राज्याच्या सत्तेत एकाच गादीवर बसलेले हे तीन पक्ष नगरपालिका निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पाचोरा नगरपालिकेच्या

निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News