राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडीला उशिर का? अजित पवारांची नाराजी
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडीला उशिर झाल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसी समाजाला द्यावं अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती. त्यातच आता
अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी अजित पवार समर्थकांनी केली आहे. तर नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीला उशीर होत असल्याने अजित पवार देखील नाराज असल्याच समजतंय. या मुद्यावर आज अजित पवार यांच्या देवगिरी निवास्थानी बैठक होत आहे.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदावारून मोठ्या हालचाली होण्याचीही शक्यता आहेत. या बैठकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि समर्थक आमदार या बैठकीसाठी उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष सुप्रिया सुळे प्रफूल्ल पटेल ही या बैठकीला उपस्थित राहीले आहेत त्यामुळे चर्चेला उधान आलय. या बैठकीला धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,दिलीप वळसेपाटील देखील उपस्थित आहे. अजित पवार यांचे समर्थक आमदार किरण लहामटे, दौलत दरोडा, अमोल मिटकरी, मकरंद पाटील, अतुल बेंनकेंची हे ही उपस्थित आहेत. त्यामुळे लवकर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडला जाण्यातची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
छगन भुजबळ
किरण लहमाटे
निलेश लंके
धनंजय मुंडे
रामराजे निंबाळकर
दौलत दरोडा
मकरंद पाटील
अनुल बेणके
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी
अदिती तटकरे
शेखर निकम
निलय नाईक
अशोक पवार
अनिल पाटील
सरोज अहिरे