Rohit pawar Troll : अदानी यांच्या गाडीचे रोहित पवार ड्रायव्हर, सोशल मीडियावर रोहित पवार ट्रोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रोहित पवार मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले आहेत.

Update: 2022-06-17 04:24 GMT

उद्योगपती गौतम अदानी बारामती येथे कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी आमदार रोहित पवार बारामती विमानतळावर गेले आणि त्यांनी गौतम अदानी यांना आपल्या गाडीत बसवून कार्यक्रमस्थळी घेऊन गेले. मात्र रोहित पवार हे अदानी यांच्या गाडीचे सारथ्य करत असल्याचा फोटो व्हायरल झाल्याने रोहित पवार यांच्यावर नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

रोहित पवार हे अदानी यांचे सारथ्य करत असल्याचा व्हिडीओ ट्वीट करून भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले की, अदानी आणि अंबानीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांना आमदार रोहित पवार यांनी आपल्या कृतीनेच उत्तर दिले आहे. अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हरसुध्दा बनू शकतात. किती हा नम्रपणा...

रंजन तेंडूलकर यांनी फोटो ट्वीट करून शरद पवार यांचे नातू रोहीत पवार अदानी यांची गाडी चालवत आहेत, असं म्हटले आहे.

गोपिचंद पडळकर फॅन्स क्लब या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, झुकता हे पवार परिवार झुकाने वाला गुजराथी अदानी चाहिए. उद्योगपती गौतम अदानी यांचे सारथ्य करताना आमदार ड्रायव्हर रोहीत पवार.. गुलाम आता पवार कुटूंबाला महाराष्ट्र द्रोही बोलतील का? असा सवाल करण्यात आला आहे.

@iamsachinmore या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटले आहे की, उद्योगपती गौतम अडानी बारामतीत दाखल. खुद्द शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी केलं उद्योगपती गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य. एकीकडे अदानी अंबानीच्या नावाने मोदींवर ताशेरे ओढायचे आणि दुसरीकडे त्याच लोकांसोबत फिरायचं. सरड्यालाही लाज वाटेल, असा टोला रोहित पवार यांना लगावला आहे.

कडू माणूस या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटले आहे की, ए बाजारु @amolmitkari22 बघ तुमच्या धाकट्या मालकाला अदानीने ड्रायव्हर बनवले!! देवाची काय लिला आहे काल बाजारु अदानींना ट्रोल करत होता, आज अदानी बारामतीत व ड्रायव्हर रोहित पवार! उडता तिर बाजारुच्या ... गेला, असा टोला अमोल मिटकरी यांना लगावला आहे.

सोशल तमाशा नावाच्या ट्वीटरवरून म्हटले आहे की, लगता है अडानी ने रोहित पवार को भी खरीद लिया

शिवानंद कबाडे यांनी अमोल मिटकरी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

प्रदीप ढवळे यांनी रोहीत पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, अदानीला हे विकले अदानीला ते विकले ,अदाणीच्या नावाचा जयघोष केल्याने अदानी चा बारामती मध्ये रोहित पवार यांना साक्षात्कार .अदानी हा विकत घेण्यासाठी च येतो तर बारामती मध्ये पवार आता काय विकणार ?

भाजप समर्थक प्रकाश अंदाडे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, गुजराती अदानींच्या गाडीचा ड्रायव्हर मराठी रोहित पवार. हा समस्त महाराष्ट्राचा अपमान आहे.

Tags:    

Similar News