तुमचं वजन वापरून काही मिळतंय का पाहा, राष्ट्रवादीचा फडणवीस यांना टोला…



Update: 2021-04-03 05:40 GMT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी लॉकडाऊनचा इशारा देत लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. यावेळी त्यांनी जगभरातील काही देशांचे उदाहरण देत परिस्थिती किती गंभीर आहे आणि लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय असेल असेही स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. 

बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय... पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय... पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे... पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...



या टिकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देताना

 पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे .... आपले केंद्र सरकार काय देणार ... अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही ... बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे ....आपले केंद्र सरकार काय देणार ...अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही ... बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून @Dev_Fadnavis https://t.co/QH60dZJHLn


— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2021

काय म्हटलं होतं फडणवीस यांनी…


"होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत... आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची... युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय... तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा ! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल. फ्रान्सने तिसर्यांआदा लॉकडाऊन लावला... पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले... हंगेरीत 'वर्क फ्रॉम होम'... पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती... पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज... ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठवण्यास मदत... पण, 2 लाख 20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांीना मदत एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यां्ना 800 युरोंपर्यंत मदत ! बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय. पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय... पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे... पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत... पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय... फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत... पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय..."


असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


Tags:    

Similar News