भाजपच्या 'त्या' यात्रेला जनता आशिर्वाद नाही तर, श्राप देतील- घाग

केंद्र सरकारकडून वारंवार होणाऱ्या गॅस सिलिंडर ,पेट्रोल, डिझेलच्या दर वाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने भर पावसात केले आंदोलन करण्यात आले.

Update: 2021-08-21 11:50 GMT

केंद्र सरकारकडून वारंवार होणाऱ्या गॅस सिलिंडर ,पेट्रोल, डिझेलच्या दर वाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने भर पावसात केले आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट येथील 22 नंबर रोड येथे गॅस दर वाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.

एकीकडे देशात सर्वत्र महागाईचा भडका उडालेला असताना, भाजपच्यावतीने जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे, या यात्रेला नागरिक आशिर्वाद नाही तर, श्राप देतील असे राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा महिला अध्यक्ष सुजाता घाग यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. दर दहा दिवसांनी गॅस सिलिंडर दरवाढ होत आहे, याच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकत्या तसेच पदाधिकारी यांनी भर पावसात आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केला.

यावेळी आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags:    

Similar News