समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली NCBची मुंबईत ६ ठिकाणी कारवाई

Update: 2021-12-14 11:58 GMT

आर्यन खान प्रकरणानंतर अडचणीत आलेले NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली NCBने मुंबईत पुन्हा एकदा कारवाईला सुरूवात केली आहे. समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबईत ८ विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या सर्व कारवायांमध्ये एकूण २ किलो २९६ ग्राम एम्फेटामाईन, तीन किलो नऊशे ग्राम अफू आणि दोन किलो ५२५ ग्रॅम झोल्पेडियमच्या गोळ्या जप्त करण्यात आल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. १० ते १४ डिसेंबर या चार दिवसांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

या सर्व ड्रग्जची परदेशात तस्करी केली जाणार होती, अशी माहितीही वानखेडे यांनी दिली आहे. या कारवाईमध्ये एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे ड्रग्ज हेल्मेटमध्ये, कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये, खाद्य पदार्थांच्या बॉक्समधून आणि स्टेथास्कोपमध्ये लपवून नेण्याचा प्रयत्न होता, अशीही माहिती वानखेडे यांनी दिली आहे.



 

NCBने मुंबईत ६ ठिकाणी गेल्या चार दिवसात कारवाई केली आहे. यामध्ये अंधेरी पूर्वमध्ये जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे डोंगरीमधून ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार होते. तर अंधेरी पूर्वमध्ये जप्त कऱण्यात आलेल्या एका मायक्रोवेव्हमध्ये तीन किलो नऊशे ग्राम अफू लपवण्यात आले होते. ते अफू मुंबईतून मालदिवला पाठवण्याचा प्रयत्न होता. यातील आणखी तीन कारवाया अंधेरी पूर्वमध्ये करण्यात आल्या आहेत. तर सहावी कारवाई डोंगरीमध्ये करण्यात आली आहे. हे ड्रग्ज दुबई, स्वित्झर्लंड, न्यूझीवंडमध्ये पाठवण्यात येणार होते, अशीही माहिती वानखेडे यांनी दिली आहे.


Full View

Tags:    

Similar News