NCB एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरी चोरी , मारला लाखो रुपये आणि दागिन्यावर वर डल्ला

आर्यन खान व कॉडिलिया क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणात प्रकाशझोतात आलेले एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे व अभिनेत्री क्रांती रेडकर या या दाम्पत्याच्या घरी चोरी झाल्याचे समोर येत आहे . घरातील मोलकरीने चोरी करुन पळुन गेल्याचा संशय अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केला आहे .या चोरीप्रकरणी गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.;

Update: 2023-01-07 14:42 GMT

  आर्यन खान व कॉडिलिया क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणात प्रकाशझोतात आलेले एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे व अभिनेत्री क्रांती रेडकर या या दाम्पत्याच्या घरी चोरी झाल्याचे समोर येत आहे . घरातील मोलकरीने चोरी करुन पळुन गेल्याचा संशय अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केला आहे .या चोरीप्रकरणी गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

समीर वानखेडे व अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या घरी मिळालेल्या माहितानुसार साडेचार लाखाचा संपत्ती चोरी गेली आहे . यात रोख रक्कम व काही दागिन्यांचा समावेश आहे . काही दिवसापुर्वी अभिनेत्री क्रांती रेडकर एजन्सीच्या माध्यमातून घर कामासाठी एका महिलेला कामावर घेतले होते.चोरीच्या तक्रारीनंतर पोलीस संबधीत एजन्सीकडे या महिलेसंबधीत माहिती चौकोशी करीत आहे. संबंधित महिला नेमकी कुठली आहे , कामावर ठेवण्यापूर्वी तिची पोलीस पडताळणी झाली होती का, एजन्सीला कायदेशीर मान्यता होती का या सर्व परीने पोलीस तपास करीत आहे.

कोण आहेत समीर वानखेडे व अभिनेत्री क्रांती रेडकर

प्रसिध्द अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अटक ते नबाब मालिक यांच्या आरोपामुळे समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आले होते.समीर वानखेडे हे IRS अधिकारी आहेत. मुंबईत NCB मध्ये प्रतिनियुक्तीवर असताना मुंबईचे झोनल अधिकारी म्हणुन त्याची कामगिरी चांगलीत चर्चेत आली होती . तसेच मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिचा विवाह २०१७ मध्ये समीर वानखेडे यांच्याशी झाला. अभिनेत्री क्रांती रेडकर ऑन ड्युटी २४ तास ,माझा नवरा, शिक्षणाचा आयचा घो,फक्त लढ म्हणा, मर्डर मेस्त्री अश्या चित्रपटात देखील काम केले आहे .

Tags:    

Similar News