Naxalite Attack :जवानांच्या ताफ्यावर नक्षली हल्ला, 10 जवानांसह ड्रायव्हर शहीद

नक्षली हल्ल्यात 10 जवानांसह ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.;

Update: 2023-04-26 11:31 GMT

छत्तीसगड जिल्ह्यात धंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

छत्तीसगडमधील बस्तर भागात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला. यामध्ये दंतेवाडा जिल्ह्यात IED स्फोटात वाहन चालकासह 11 जिल्हा रिझर्व्ह गार्डचे जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडी जिल्ह्यातील अरनपूर येथून जाणाऱ्या जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ला झाल्याची पुष्टी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. तसेच भूपेश बघेल यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

राहुल गांधी यांनीही दंतेवाडा येथे झालेल्या जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिली.

छत्तीसगडमध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्याबरोबरच सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन अमित शहा यांनी दिले आहे.

Tags:    

Similar News