'ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवलं' नवाब मलिक यांच्या मुलीचं भावनिक पत्र

Update: 2021-11-06 12:17 GMT

आर्यन खान प्रकरणावरुन महीनाभर मीडिया आणि सोशल मिडीयावर गदारोळ झाला. आर्यनच्या जामीनावरील सुटकेने वादळ शांत होईल असं वाटत असतानाही आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

त्यानंतर आता नवाब मलिक यांची मुलगी मुलगी निलोफर मलिक-खान यांनी एक पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. निलोफर यांचे पती समीर खान यांना एका ड्रग्ज प्रकरणात समीरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. या अटकेनंतर एनसीबीने मुंबईतही अनेक ठिकाणी छापे टाकले होते. समीर खान सध्या अटकेत आहेत.

त्या दरम्यान नवाब मलिक यांच्या मुलीने एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी

'जनतेला गृहीत धरले जाऊ नये. जे अपराधी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर लोकांना आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि आमच्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढा द्यावा'

असं आवाहन या पत्रातून केलं असून त्यांनी 'ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवलं' असं म्हणत या पत्राचं कॅप्शन 'एका निष्पापाच्या पत्नीचे खुले पत्र' असं दिलं आहे.

सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

दरम्यान NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून नवाब मलिक यांच्या जावयाची केस काढून घेण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा तपास ज्ञानेश्वर सिंह यांच्या दिल्लीच्या टीमकडून करण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News