नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करुन जिवंत जाळले

Update: 2021-02-07 06:51 GMT

पालघर जिल्ह्यात एका नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या नौदल अधिकाऱ्याचे नाव सुरज कुमार दुबे (२७ वर्षे) असं असून त्याला बंदुकीचा धाक दाखवून चेन्नई विमानतळाजवळून त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.

हा अधिकारी झारखंडचा असल्याचं पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले आहे. अपहरण कर्त्यांनी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबाकडून १० लाख रुपयांची खंडनी मागितली होती. ही खडंणी न मिळाल्यानं या अधिकाऱ्याला पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या जंगलात पेट्रोल टाकून जिवंत जाळले.

स्थानिक नागरिकाने पोलिसांना तात्काळ ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल केले. यावेळी अधिकाऱ्याने पोलिसांना ही माहिती दिली. मात्र, उपचारादरम्यान अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News