सुनो धामी जी म्हणत नवाब मलिकांचा भाजपवर घणाघात
पाच राज्यातील निवडणूकांचा रणसंग्राम सुरू आहे. त्यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यापार्श्वभुमीवर उत्तराखंडमधील व्हिडीओ शेअर करत नवाब मलिकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
पाच राज्यातील निवडणूकांचा रणसंग्राम सुरू आहे. त्यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यापार्श्वभुमीवर उत्तराखंडमधील व्हिडीओ शेअर करत नवाब मलिकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपुर आणि गोवा राज्यात निवडणूकीची धामधूम सुरू आहे. तर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यातच उत्तराखंडमध्ये पुष्कर धामी सरकारकडून महिला मतदारांना टिकल्यांचे पाकीट देत आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरून राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर घणाघाती टिका केली आहे.
नवाब मलिक यांनी ट्वीटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एका महिलेच्या हातात भाजपच्या चिन्ह आणि नेत्यांचे फोटो छापलेला लिफाफा आहे. त्यावर मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत आहे. तर दुसऱ्या बाजुला महिलांच्या टिकल्या दिसत आहेत. मात्र या व्हिडीओत ती महिला म्हणते की, उत्तराखंडमध्ये पुष्कर धामी यांचे सरकार टिकल्या वाटून मत मिळवत आहे. मात्र टिकल्यांच्या अमिषाने कोणी मत देतं का? असा सवाल महिलेने केला आहे. त्यावरून नवाब मलिक यांनी ट्वीट करत सुनो धामी जी बिंदी पर क्या बोल रही है उत्तराखंड की बहने असे म्हटले आहे.
सुनो धामी ज़ी बिंदी पर क्या बोल रही हैं उत्तराखंड की बहने । pic.twitter.com/ojdPzrZQnx
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 11, 2022
भाजपची जाहीरात असलेले टिकल्यांचे पाकीट वाटल्याने मतदारांना अमिष दाखवल्याच्या प्रकरणावरून उत्तराखंडमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.