एस एस राजामौली यांचा RRR चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यातच या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने नवा इतिहास रचला आहे. दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकत चांगलीच धमाल उडवून दिली आहे.
सध्या ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थिएटरमध्ये सुरुवात झाली आहे. यामध्ये बेस्ट ओरिजनल स्कोअर पुरस्कार एस एस राजामौली यांच्या RRR मधील 'नाटू नाटू' (Natu Natu) या गाण्याला मिळाला आहे.
ऑस्करच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात नाटू - नाटू या गाण्याला तर The Elephant Whisperers' या भारतीय डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म हा ऑस्कर मिळाला आहे.
यंदाचा ९५ वा ऑस्कर पुरस्कार Everything Everywhere All At Once या चित्रपटाला मिळाला.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार Everything Everywhere All At Once या चित्रपटाला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग हा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट original screenplay पुरस्कार Everything Everywhere All At Once या चित्रपटासाठी डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना मिळाला आहे.
Original visual effects पुरस्कार अवतार या चित्रपटाला मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म हा पुरस्कार 'द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स' ला मिळाला आहे.