नरेंद्र मोदी आता 2024 साठी सुरक्षित मतदासंघ शोधा, ममता बॅनर्जींनी दंड थोपटले

ममता बॅनर्जी नंदीग्रामधून पराभूत होणार का? ममता बॅनर्जी दुसरा मतदारसंघ शोधत आहेत का? काय म्हटलंय मोदींनी? तृणमुल कॉंग्रेस मोदींविरोधात उमेदवार का देणार? वाचा काय आहे सर्व प्रकरण

Update: 2021-04-02 04:45 GMT
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सर्वात हॉट सीट असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं. या मतदारसंघातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचे पुर्वीचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांना त्यांनी थेट आव्हान दिलं आहे. ममता बॅनर्जी यांनी आपला सुरक्षित भवानीपूर मतदारसंघ सोडून बंडखोरी रोखण्यासाठी नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत.

या ठिकाणी काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराजीत होत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.


"दीदी, तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहात, ही अफवा खरी आहे का? पहिल्यांदा तुम्ही नंदीग्राममध्ये गेलात आणि लोकांनी तुम्हाला उत्तर दिलं. जर तुम्ही इतर कुठेही गेलात तर बंगालचे लोक तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार आहेत?," 



यावर तृणमुल कॉंग्रेसने नरेंद्र मोदी यांना उत्तर दिलं आहे…


"दीदी, नंदीग्राममधून जिंकत आहे. दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. नरेंद्र मोदीजी पश्चिम बंगालमध्ये अर्ज भरण्याच्या अखेरीस तुमचं खोटं लोकांच्या नजरेत येण्याच्या आधीच लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न थांबवा. आपण २०२४ साठी सुरक्षित मतदासंघ शोधा, कारण वाराणसीमध्ये तुम्हाला आव्हान दिलं जाईल,"


Tags:    

Similar News