मोदी आणि जेलेंस्की यांच्यामध्ये 35 मिनिटं चर्चा, काय म्हणाले मोदी

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिदीमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. हे संभाषण जवळ जवळ 35 मिनिटे चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.;

Update: 2022-03-07 11:40 GMT

रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, तरीही सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. रशिया युक्रेनच्या सर्व प्रमुख शहरांवर सतत बॉम्बफेक करत आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिदीमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. हे संभाषण जवळ जवळ 35 मिनिटे चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.

या संभाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या देशात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संभाषणाच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारकडून मिळत असलेली मदत कायम राहील, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

सोमवारी सकाळी रशियाने सांगितले की युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धविराम केला जाईल. या शहरांमध्ये खार्किव, मारियुपोल आणि सुमी या शहरांचा समावेश आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यासंदर्भात रशियाला विनंती केली होती.

युक्रेनच्या युद्धक्षेत्रातून लोकांना बाहेर काढण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत या भागातून मोठ्या संख्येने लोकांना बाहेर काढण्यात आले आहे तर सुमी शहरात अजुनही सुमारे 700 भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.

भारताने 26 फेब्रुवारीपासून 76 फ्लाइट्सद्वारे ऑपरेशन गंगा अंतर्गत 16,000 भारतीयांना परत आणले आहे. मात्र, अजूनही तेथे अडकलेल्या भारतीयांना खाण्यापिण्याच्या अडचणींसह इतर अडचणींना सामोरं जावं लागत आहे.



Tags:    

Similar News