सेनाभवन बांधण्यासाठी ५ पैसे तरी दिले का, नारायण राणेंचा संजय राऊतांना सवाल

शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेतली होती.राऊतांनी भाजपनेते किरिट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर अनेक भाजपनेत्यांनी प्रत्युत्तर दिले.त्यावर आता नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत टिका केली आहे.;

Update: 2022-02-16 14:52 GMT

 शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेतली होती.राऊतांनी भाजपनेते किरिट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर अनेक भाजपनेत्यांनी प्रत्युत्तर दिले.त्यावर आता नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत टिका केली आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊतांना घाम फुटला होता.असं नारायण राणे म्हटले.त्यांची केविलवाणी परिस्थिती झाली होती.ते वारंवार सांगत होते की मी कुणाला घाबरत नाही. मर्दाची शिवसेना आहे.पण मर्द माणसाला सांगायची काय गरज,जो घाबरतो तोच सांगत असतोय,की मी कुणाला घाबरत नाही. असे नारायण राणे म्हणाले.पत्रकार परिषदेची जहिरात सांगत होती की राज्यभरातले नेते मंत्री येणार पण साधे विभागप्रमुखही आले नव्हते,

संजय राऊत का बेजबाबदारपणे घामाघूम होऊन बोलत होते? प्रविण राऊतांनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर हा थयथयाट सुरू झाला. का फक्त आरोप करता? पुरावे द्या ना? सुजीत पाटकर संजय राऊतांचे कोण लागतात? त्यांच्या नावाने इतके व्यवहार कसे करता? त्यांच्या कंपनीत संजय राऊतांच्या मुली कशा संचालक असतात? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असं बाळासाहेब म्हणाले होते असं देखील राणे म्हणाले. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली? जणू शिवसेना प्रमुख हेच झालेत अशा आवेशात पत्रकार परिषद घेतली, असं राणे म्हणाले.

शिवसेना, बाळासाहेबांचा आर्शिवाद याबद्दल बोलणारे संजय राऊत हे शिवसेनेच्या स्थापणेनंतर २६ वर्षांनी पक्षात आम्ही निधी गोळा करुन शिवसेना उभारल्याच्या उल्लेखही नारायण राणेंनी केला, तु आलास कधी, शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनी आला, शिवसेना बांधताना आम्ही पैसे गोळा केले,आम्ही एवढं केलं म्हणुन सत्ता आहे.राऊतांचे शिवसेना भवनाच्या उभारणीत पाच पैसे तरी आहेत का? कोणाच्या कानफटात मारली संजय राऊतने असं कुठे, कधी वाचलं का,उसनं अवसान काशासाठी, असा एकेरी उल्लेख करत राणेंनी राउत यांच्यावर निशाना साधला.

भाजपा विरेधात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलागा त्यांना पुरुन उरेल,त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही.असं सांगतानाच आरोप खरे असतील तर पत्रकार असणाऱ्या संजय राऊतांनी पुरावे सादर करावेत असं आव्हान नारायण राणेंनी केलयं.

Full View

Tags:    

Similar News