Sharad Pawar: राणे सहकुटुंब ब्रीच कॅंडीत पवारांच्या भेटीला

Update: 2021-03-31 08:34 GMT

ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राणे कुटुंबियांनी पवारांची भेट घेतली आहे. पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवल्यानं त्यांच्या पोटातील पित्ताशयाचे खडे इंन्डोस्कोपीद्वारे काढण्यात आले आहेत. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. 

त्यानंतर आज सकाळी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी पवार यांची भेट घेतली. नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आले होते.


सुप्रिया सुळे यांचं ट्विट:

या शास्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार दिसत आहेत.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये शरद पवार हे वर्तमानपत्र वाचतांना दिसत आहेत.

सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत.

असं सुळे यांनी ट्विट मद्धे म्हंटलं आहे.

Tags:    

Similar News